राजापूर पालिकेची मोकाट गुरांविरोधात कारवाई

राजापूर पालिकेची मोकाट गुरांविरोधात कारवाई
Published on

-rat६p१०.jpg-
26O55633
राजापूर ः गोशाळेमध्ये मोकाट गुरे सोडताना नगर पालिका कर्मचारी.
-----
मोकाट गुरांना गोशाळेचा मार्ग
राजापूर पालिकेची कारवाई ; १३ गुरांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः राजापूर शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनल्याने नगरपालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या १५ गुरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. या गुरांना दंड भरून सोडवून नेण्याचे आवाहन पालिकेने केले होते; मात्र, केवळ दोनच गुरांना मालकांनी सोडवून नेले. त्यामुळे उर्वरित १३ गुरांची पशुधन अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांना चिपळूण येथील गोशाळेत जमा करण्यात आले आहे.
राजापूर शहर आणि लगतच्या गावांमधील गुरांचा शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठेत मोठा वावर असतो. अनेकदा ही गुरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच किरकोळ अपघाताचे प्रसंग घडतात. या समस्येमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांनी व नागरिकांनी पालिकेकडे कारवाईची जोरदार मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या बैठकीत मोकाट गुरांच्या विषयावर सखोल चर्चा झाली. मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात ठेवल्यानंतरही जर मालकांनी प्रतिसाद दिला नाही तर ती गुरे थेट गोशाळेत पाठवली जातील, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार पालिकेने महिनाभरात दोन टप्प्यांत 15 गुरे पकडली होती. दंडात्मक कारवाई केल्यावर अवघ्या दोन गुरांचे मालक पुढे आले. त्यामुळे उर्वरित 13 गुरांची कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना चिपळूण येथील गोशाळेच्या ताब्यात देण्यात आले.
---
कारवाई सुरूच राहणार
भविष्यातही शहरात मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर अशीच कडक आणि धडक कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा राजापूर नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com