कुडाळात उद्या येरे घना कविसंमेलन

कुडाळात उद्या येरे घना कविसंमेलन
Published on

कुडाळात उद्या येरे घना कविसंमेलन
कुडाळ :कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ''येरे घना'' कविसंमेलन आयोजित केले आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय, सेमिनार हॉल येथे होणाऱ्या संमेलनामध्ये सहभाग घेणाऱ्या कवींना एका कवितेचे वाचन करता येईल. साहित्यप्रेमी कवींनी, तसेच महाविद्यालयीन नवोदित कवींनीही संमेलनामध्ये सहभाग घेऊन कविसंमेलन यशस्वी करावे, असे आवाहन कोमसाप येथील शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांनी केले आहे. सहभाग घेणाऱ्या कवींनी आपली नावं कोमसाप कार्यवाह सुरेश पवार यांच्याकडे नोंदवावीत.
------------
मेगा मेडिकल स्पेशालिटीचे आज शिबिर
ओरोस : पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या (ता. ८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्डिओलॉजिस्ट, कार्डिॲक सर्जन, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन, युरो सर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग, नेत्ररोग, दंत, हृदयरोग व मधुमेह, फुफ्फुसरोग, मानसोपचार, बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच रक्तदाब, रक्तातील साखर, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, टूडी इको, ईसीजी आणि प्रयोगशाळेतील रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शालेय मुलांची आरोग्य तपासणीही करण्यात येणार असून, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्डच्या सुविधाही शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com