हर्ष नकाशेच्या गोड सुरांनी रंगणार सम्राट संगीत सभा

हर्ष नकाशेच्या गोड सुरांनी
रंगणार सम्राट संगीत सभा
Published on

55852
हर्ष नकाशे

हर्ष नकाशेच्या गोड सुरांनी
रंगणार सम्राट संगीत सभा
सावंतवाडी, ता. ७ : मये गोवा येथील सम्राट क्लबतर्फे १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सम्राट संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गावकारवाडा, मये-डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात पार पडणार आहे. या विशेष संगीत सभेत सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि ‘सम्राट संगीत सितारा २०२६’चा विजेता हर्ष नकाशे हा आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या मैफलीत त्याला उत्कर्षा फोंडेकर यांची हार्मोनियमवर तर मिलिंद परब यांची तबल्यावर उत्कृष्ट साथ लाभणार आहे. गोवा व सिंधुदुर्गातील संगीतप्रेमींसाठी ही संगीत सभा म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरणार आहे. या संगीतमय मैफलीला सर्व संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com