

swt73.jpg
55856
पाट हायस्कूलमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
पाट हायस्कूलमध्ये खाद्य उत्सव
म्हापण : खाद्यपदार्थ विक्रीवर शालेय परिसरात विविध निर्बंध आल्यामुळे मुलांना आरोग्यासाठी चांगले खाद्य कोणते हे समजावे म्हणून इको क्लब आणि हरित सेना स्कूलच्या वतीने खाद्य उत्सव घेण्यात आला. यामध्ये मुलांनी पालकांनी बऱ्याच वस्तूंची निर्मिती केली. यामध्ये अळूवडी, नाचणीचे ढोकळे ,तांदळाचे प्रकार भाज्याचे पराठे, भाज्यांचे प्रकार, इडली सांभार, मोड आलेली मूग मटकी पासून तयार केलेली भेलआणि भज्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे विविध वन औषधीपासून बनविलेलेपदार्थ होते. आरोग्यदायी खाद्य कोणते हे मुलांना समजावे हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा होता. पाट हायस्कूल हरित सेना आणि इको क्लबमार्फत वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात यावर्षी सीड बॉलचाही प्रमुख उपक्रम घेण्यात आला. यामध्ये जवळजवळ एक हजार सीडबॉल बनवले होते. त्यांचेही वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक सयाजी बोंदर, अंकिता मोडक, संदीप साळसकर, यज्ञा गोसावी, सिद्धी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.