

55861
‘रवळनाथ’ची प्रगती प्रामाणिकपणामुळेच
उदय पारळे : कुडाळात सभासदांसह पाल्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ : वैयक्तिक उत्कर्ष बाजुला ठेऊन निस्वार्थ आणि अत्यंत तळमळीने संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले आणि संचालक मंडळाने ही संस्था उभी करण्यात योगदान दिले आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम केल्यामुळेच संस्थेची प्रगती होत आहे. उत्तम सेवा आणि सामाजिक बांधिलकीतून विश्वासार्ह संस्था, असा नावलौकीक ‘रवळनाथ’ने निर्माण केला आहे, असे प्रतिपादन बांधकाम व्यावसायिक उदय पारळे यांनी केले.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली येथील शाखेत आयोजित अमृतमहोत्सवी व सेवानिवृत्त सभासद, यशवंत पाल्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, शाखा चेअरमन मनोहर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. चौगुले म्हणाले, ‘‘गेल्या ६ वर्षांत कुडाळ शाखेने १४ कोटी ठेवी आणि २६ कोटींचे कर्ज वितरण करुन ४० कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे कोकणातील सभासद, ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करण्यात संस्थेला यश मिळाले आहे. बँकिंग व्यवहारासह सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संस्थेमार्फत सर्वशाखांमध्ये मोबाईल बँकिंग, सी. बी. एस. याद्वारे डिजिटल सेवा दिली जाते. आरटीजीएस/एनईएफटी सुविधा, वीज बीलभरणा यासह ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजारी व वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा सुरु आहे. आकर्षक व्याजदर मिळणाऱ्या विविध ठेव योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी दिलीप तुळसकर यांचा अमृतमहोत्सवी तर प्रा. डॉ. अनंत लोखंडे, चंद्रकांत मळगावकर, नेहा माईणकर, यांचा निवृत्तीनिमित्त तसेच अक्षता वालावलकर, अनिता राऊळ, मधुरा नाईक, श्रृती घाडीगांवकर, आर्या गावडे या यशवंत पाल्यांचा सत्कार केला. संस्थेचे कर्मचारी आशिष पालकर यांना शासनाच्या दशावतार नाट्यमहोत्सवामध्ये सहभाग घेऊन उत्तम कला सादर केल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळ शाखा चेअरमन मनोहर गुरबे यांनी स्वागत केले. चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी प्रास्ताविक केले. कुडाळ शाखा सल्लागार अशोक येजरे यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर गुरबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाखा सल्लागार रुपाली शिरसाट, स्नेहा नाईक, शाखाधिकारी विक्रम जांभेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.