

-rat७p१३.JPG ः
26O55831
चिपळूण ः शेतकरी सन्मान कार्यक्रमात बोलताना सभापती सूर्यकांत खेतले.
-----------
शेतकऱ्यांनी गटशेतीची कास धरा ः खेतले
चिपळूण ः गटशेतीमुळे उत्पादनावरील खर्च कमी होऊन स्वतःचा ब्रँड तयार करणे शक्य होते. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटशेतीची कास धरावी, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले यांनी केले. कृषी विभाग, आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) आणि कृषी वसंत शेतकरी विकास संघ, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम शहरातील वनविभागाच्या सभागृहात झाला. या प्रसंगी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त धनंजय केतकर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार अनंत खांबे, नाचणी पीक स्पर्धा विजेते धाकटू गावकर (ढोक्रवली), आत्माराम पुनवत (दहिवली खुर्द), नारायण दुर्गाळी (वीर), श्रीधर पालशेतकर (तुरंबव), उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त दत्ताराम वीर यांचा सन्मान केला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.