लोककला संवर्धनाचा ओंकार शीतप यांचा ध्यास

लोककला संवर्धनाचा ओंकार शीतप यांचा ध्यास
Published on

-rat७p५.jpg-
26O55817
रत्नागिरी ः ओंकार शितप
-rat७p६.jpg-
26O55818
रत्नागिरी ः लोककलेच्या ध्यासाने युवा कलाकारांना सोबत घेऊन ओंकारच्या नमन कलासंचातील कलाकार.
------
लोककला संवर्धनाचा ओंकार शितप यांचा ध्यास
नमन मंडळाची स्थापना; नमन, जाखडी, लोकसंगीतातून संस्कृतीची जपणूक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः कोकणची पारंपरिक लोककला आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या ध्यासाने वाटद-वझरवाडी येथील लोकशाहीर, कलावंत ओंकार शितप कार्यरत आहेत. नमन, जाखडी आणि लोकसंगीताच्या माध्यमातून त्यांनी कोकणच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी वेगळा ठसा उमटवला आहे.
संसारातील अनेक अडचणींवर मात करत शितप यांनी नमन ही पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगले. कोरोना काळानंतर २०२१ मध्ये त्यांनी समविचारी युवा कलाकारांना एकत्र करून ‘श्री कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळा’ची स्थापना केली. अवघ्या १८ कलाकारांपासून सुरू झालेला हा संच आज गुहागर, रत्नागिरी, खेड, राजापूर आणि लांजा परिसरातील रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. पारंपरिक लोककलेला आधुनिक संगीताची जोड, शुद्ध भाषाशैली आणि पात्रांची योग्य निवड हे संचाचे वैशिष्ट्य आहे.
शितप यांनी २०१० मध्ये गायनक्षेत्रात पदार्पण केले. पुढे जाखडीतील कलगीवाले शाहीर म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. महाराष्ट्र गौरव भूषण कवी, शाहीर गुरूवर्य शंकर भारदे गुरुजी यांचे ते शिष्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून शितप यांनी लोककलेचा वारसा पुढे नेला. ‘श्री राधाकृष्ण नृत्य कलापथका’च्या माध्यमातून मुंबईच्या रंगमंचावरही त्यांनी कला सादर केली आहे. लोककलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा शितप यांचा हा प्रयत्न रसिकांची दाद मिळवत आहे.
---
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com