रत्नागिरी ः जिल्ह्यातील 26 हजार ज्येष्ठांनी काढले आयुष्मान कार्ड

रत्नागिरी ः जिल्ह्यातील 26 हजार ज्येष्ठांनी काढले आयुष्मान कार्ड
Published on

ज्येष्ठांना ५ लाखांचे आरोग्यकवच
डॉ. अनिरूद्ध आठल्ये ः २६ हजार आयुष्मान कार्डधारक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः केंद्र व राज्यशासनामार्फत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू केलेल्या आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार १२५ ज्येष्ठांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त मोफत उपचार (टॉप-अप) उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ६४३ नागरिकांनी हे कार्ड काढले असून, उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांनी तातडीने कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा आहे; मात्र, ज्या कुटुंबांकडे आधीपासूनच आयुष्मान कार्ड आहे त्या कुटुंबातील ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत स्वतंत्र ५ लाख रुपयांचे अतिरिक्त (टॉप-अप) आरोग्यकवच देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हे आयुष्मान वय वंदना कार्ड पूर्णपणे मोफत असून, आजारपणाच्या वेळी कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा देणारे ठरणार आहे. जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक यापासून वंचित राहू नये म्हणून सर्वांनी लवकरात लवकर कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आरोग्य सभापती विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

चौकट
55952
कार्ड कुठे आणि कसे काढायचे?
* beneficiaries.nha.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘आयुष्मान’ मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन कार्ड काढता येते.
* रुग्णालयांतील आरोग्यमित्र, गावातील आशासेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र तसेच स्थानिक रेशन दुकानदारांमार्फत हे कार्ड ऑफलाईन काढता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com