

56018
सावंतवाडीत उद्या ‘तिरंगा रॅली’
विशाल परब ः स्वच्छता मोहीम, माजी सैनिकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केले आहे.
येथील उपरलकर देवस्थान येथून सोमवारी (ता. १०) या यात्रेचा प्रारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थिती होणार असल्याची माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब व जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रसन्न देसाई, शहराध्यक्ष नगरसेवक सुधीर आरीवडेकर, सुहास गवंडळकर, रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
सोमवारी (ता. १०) सकाळी १० वाजता उपरलकर देवस्थान येथून तिरंगा रॅलीला प्रारंभ होईल. सावंतवाडी मतदारसंघातील माजी सैनिक, देशप्रेमी, भाजपचे सर्व मान्यवरांचा समावेश त्यात असेल. या रॅलीचे आगमन ११ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान, भारत माता जयघोष होणार आहे. पाच ठिकाणी विशेष तिरंगा सेल्फी पॉईंट उभारले आहेत. माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे श्री. परब यांनी सांगितले. संपूर्ण जिल्हाभरात ही यात्रा आयोजित केली आहे. तसेच शहीद स्मारक, वीर स्तंभ आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. १० ते १३ ऑगस्टपर्यंत यात्रा होणार असून १३ ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे, असे श्री. गावडे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.