

56027
चौकुळ कॉलेजची विद्यार्थिनी दत्तक
ओटवणे ः सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत राज्यात रेकॉर्ड केलेले ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा चौकुळ क्र. ५ नेनेचे मुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत सावंत यांनी आता चौकुळ ज्युनियर कॉलेजमधील एक विद्यार्थिनी दत्तक घेतली. त्यांनी आतापर्यंत तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचे चौकुळ कॉलेजच्या वतीने आभार मानले. डॉ. सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा ८७ शाळांमधील १४७ विद्यार्थिनी कायमस्वरुपी दत्तक घेत चार लाख ६१ हजार रुपये कायमस्वरुपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या मुलींचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. डॉ. सावंत यांनी दिव्या गावडे विद्यार्थिनीची यापूर्वीच्या शाळेतील हॉस्टेलची प्रलंबित ५००० रुपये फी भरली. यावेळी चौकुळ ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विजय पाटील, प्रा. राधिका आवटे, प्रा. प्रणिता गावडे, संस्कृती चव्हाण, दिलीप गावडे, दिव्या गावडे उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.