तळवडे इंग्लिश स्कूलचे समूहनृत्य स्पर्धेमध्ये यश

तळवडे इंग्लिश स्कूलचे
समूहनृत्य स्पर्धेमध्ये यश
Published on

56152

तळवडे इंग्लिश स्कूलचे
समूहनृत्य स्पर्धेमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः येथील यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव-२०२६’अंतर्गत शनिवारी (ता. ८) जिल्हास्तरीय देशभक्ती कला महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवामध्ये तळवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला.
स्वातंत्र्यवीरांचा त्याग, बलिदान आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच कला, संस्कार आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवामध्ये इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला. सहभागी विद्यार्थ्यांना रौप्यपदक आणि शाळेला चषक देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धकांचे आणि प्रशिक्षिका मान्या कांबळे यांचे प्रशालेच्या सीईओ मैथिली नाईक, संस्था सदस्य, मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर आदींनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवडे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com