

56192
ओझर विद्यालयात गुरुंप्रती कृतज्ञता
कांदळगावातील सोहळा; माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी उमेश कोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे प्रदीर्घ काळ अध्यापन केलेले गुरुवर्य जयसिंगराव जाधव यांचा सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उमेश कोदे यांनी गुरुवर्य जाधव यांच्यासाठी लिहिलेला ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा’ हा गुरुवंदना करणारा विशेष लेख त्यांना समर्पित केला. या कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थी तथा शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नारायण नरे यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांचे औक्षण करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी एस. एस. पेडणेकर, माजी मुख्याध्यापिका यू. डी. मुरवणे, माजी विद्यार्थी बाळ नरे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सदानंद कांबळी, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजकल्याण सह-आयुक्त श्यामसुंदर पेडणेकर, मसुरे हायस्कूलच्या शिक्षिका अर्चना कोदे, मुख्याध्यापक डी. डी. जाधव, पी. के. राणे, उमेश कोदे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्याला माजी प्राथमिक शिक्षिका अंजली कांदळगावकर, शालेय समिती सदस्य जयराम कांबळी, लिपिक रविराज जाधव, कर्मचारी मधुसूदन परुळेकर, विमा प्रतिनिधी सच्चिदानंद गोलतकर, १९८०-८१ बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, हडी गावातील ग्रामस्थ व ओझर विद्यामंदिरचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी तथा सहाय्यक शिक्षक पी. आर. पारकर यांनी केले. उमेश कोदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.