क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण
Published on

56214

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण

करूळमध्ये क्रांती दिन; कर्णिक स्मारकस्थळी अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रशासन व नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक, करूळ येथे रविवारी क्रांती दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकातील विजयस्तंभांना पुष्पचक्र अर्पण करून व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करूळच्या विद्यार्थिनींनी सुमधुर क्रांतीगीत सादर करून कार्यक्रमात देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. यावेळी करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था सदस्य गणेश जेठे यांनी क्रांती दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून क्रांती दिनाचा इतिहास उलगडून सांगितला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच आजच्या काळातील खरा क्रांती दिन ठरेल, असे त्यांनी सांगितले. क्रांतिकारकांच्या स्मृती व इतिहास जपतानाच त्यांच्या विचारांचेही जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थेचे सदस्य गणेश जेठे, भास्कर सावंत, मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, आप्पा तेंडुलकर, पोलीस पाटील गणेश जाधव, सरपंच सौ. समृद्धी नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, माजी सरपंच बबन कर्णिक उपस्थित होते. सिद्धेश खटावकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com