

लांजा येथे २२ रोजी व्याख्यान
लांजा ः शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) लांजा येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, जीवनातील ध्येय, आत्मविश्वास, जिद्द तसेच यशासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टिकोन याबाबत या व्याख्यानातून मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांनी भविष्यात मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाची माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे लांजा तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ यांनी दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
- rat१०p६.jpg-
26O56347
मिलिंद वाघाटे
राज्य केंद्रप्रमुख संघटनेच्या लांजा
तालुकाध्यक्षपदी मिलिंद वाघाटे
लांजा ः महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ या संघटनेच्या लांजा तालुकाध्यक्षपदी आसगे केंद्राचे केंद्रीय प्रमुख मिलिंद वाघाटे यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ ही संघटना राज्यव्यापी केंद्र लोकांचे नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना आहे. या संघटनेचे राज्यनेते बाबाजी शिर्के व केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी एका पत्रकाद्वारे वाघाटे यांची लांजा तालुका केंद्रप्रमुख संघ या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणारे पत्र सुपूर्द केले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित कार्यकारी संचालक मंडळ गठित करण्याचे आदेश वाघाटे यांना देण्यात आले आहेत केंद्रप्रमुख संघटना शाखा लांजाच्यावतीने सर्व केंद्रप्रमुखांना प्रशासकीय कामात सुलभता येण्यासाठी केंद्रप्रमुख संघ मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख या संघटनेच्या छताखाली एकत्र झाले आहेत. दैनंदिन प्रशासकीय कामकाजात विविध प्रकारचे मार्गदर्शन करणे, यासारखी कार्ये संघटनेच्यावतीने करण्यात येतील, असे सुतोवाच लांजा तालुकाध्यक्ष वाघाटे यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.