कुक्कुटपालनातून महिलांनी साधावा आर्थिक विकास

कुक्कुटपालनातून महिलांनी साधावा आर्थिक विकास
Published on

kan१०१.jpg
५६३५५
लोरे : येथील कार्यक्रमात डॉ. तुषार वेर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.

कुक्कुटपालनातून महिलांनी साधावा आर्थिक विकास
डॉ. तुषार वेर्लेकर : लोरे नं. १ ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर
कणकवली, ता. १० : शेतीला जोड उद्योग म्‍हणून महिलांनी कुक्‍कुट पालन करावे. त्‍या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर यांनी केले.
तालुक्‍यातील लोरे नंबर १ ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत ‘महिला कुक्कुटपालन मार्गदर्शन शिबिरा’चे लोरे शाळा नंबर १ येथे केले होते. यात डॉ. वेर्लेकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, कुक्कुटपालन हा केवळ जोडधंदा नसून आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि शासकीय योजनांची जोड दिल्यास तो अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
शिबिरात उपस्थित महिलांना कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात कशी करावी, कोंबड्यांच्या योग्य प्रजातींची निवड, खाद्य व स्वच्छता व्यवस्थापन, वेळोवेळी करावयाचे लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाय तसेच उत्पादित कोंबड्या व अंड्यांचे विपणन याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कमी गुंतवणुकीत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्यास नियमित व चांगले उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे डॉ. वेर्लेकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात सरपंच अजय रावराणे म्‍हणाले, घरच्या घरी अल्प भांडवलात सुरू करता येणारा कुक्कुटपालन व्यवसाय महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या प्रत्येक महिलेला येत्या ऑक्टोबर महिन्यात एक महिना वाढ झालेली कोंबडी ग्रामपंचायतीतर्फे मोफत देण्यात येणार आहे.
शिबिराला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भातील विविध शंका व प्रश्न तज्ज्ञांकडून जाणून घेतले.या कार्यक्रमास उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कलढोने, ग्रामपंचायत सदस्या सुमन गुरव, महिला बचत गटांच्या पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com