गतिरोधकांअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

गतिरोधकांअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात
Published on

56381
गतिरोधकांअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

पाडलोस रस्ता धोकादायक; तत्काळ कार्यवाहीची ‘बांधकाम’कडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः पाडलोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
शाळेच्या परिसरातून मुख्य रस्ता जात असून, या ठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी धोकादायक वळण आहे. शाळेतील लहान मुले खेळताना अथवा शाळेत ये-जा करताना अचानक रस्त्यावर आल्यास भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळेजवळच असलेल्या वळणामुळे समोरून येणारे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना एकमेकांचा अंदाज सहज येत नाही. त्यामुळे हा परिसर अपघाताच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
.....................
सुरक्षा फलकाची गरज
अनुचित घटना घडण्याची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून शाळेच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारावेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षाफलक व रस्त्यावर सूचना पट्टे लावावेत, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी केली आहे.
.....................
शाळेजवळ वाहन चालवताना काळजी घ्या
शाळा परिसरातून वाहन चालवताना चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. धोकादायक वळणावर विशेष काळजी घेत ओव्हरटेक करणे टाळावे. लहान मुले अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालवावे. रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये. पावसाळ्यात रस्ता निसरडा असल्याने वेग आणखी कमी ठेवावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. वळणावर समोरचे वाहन किंवा पादचारी स्पष्ट दिसत नसल्यास वेग कमी करून आवश्यकतेनुसार थांबावे, असे आवाहन केले आहे.
---
कोट
याच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय असल्याने विविध कामांसाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याने कोणत्याही निवेदनाची प्रतीक्षा न करता याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- सागर गावडे, सामाजिक कार्यकर्ते, पाडलोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com