

swt१०१०.jpg
५६३६७
नांदगाव : येथे हिंदू जनजागृती भारुड महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.
भारुड, भजनातून तरुण पिढीला दिशा
नीतेश राणे : नांदगाव येथे हिंदू जनजागृती भारुड महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १० : देश विघातक शक्तीना रोखण्याची आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीला प्रबोधनाची गरज आहे आणि गरज भारुड मोहत्सवातून व भजनाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल. तरुण पिढीला दिशा देण्याचे काम अशा उपक्रमातून होईल असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
राज्यात पहिल्यांदाच कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ चा उद्घाटन सोहळा दिमाखात झाला यावेळी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे, कलाकार समिती जिल्हा अध्यक्ष संतोष कानडे, भजन समितीचे अध्यक्ष प्रकाश पारकर बुवा, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उद्योजक विशाल कामत , असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर आदी मान्यवर व तालुक्यातील भजन सांप्रदायिकचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, माझ्याजवळ भजनी संस्थेचे पदाधिकारी जेव्हा आले भारुड महोत्सवाची संकल्पना मांडली तेव्हा भारुड महोत्सव माझ्या जिल्ह्यात होत असेल तर त्यातून समाज प्रबोधन होत असेल महाराष्ट्रातील पहीलाच भारुड महोत्सव नांदगाव येथे घेण्याचे सांगितले. आणि सुंदर असा भारुड महोत्सव या ठिकाणी होत आहे असेच महोत्सव दरवर्षी आपल्या जिल्ह्यात गावागावात व्हायला हवे फक्त कुठल्या गावात घ्याची ते गाव निवडण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा असेही पालकमंत्री राणेंनी सांगितले. प्रास्ताविक बुवा निलेश ठाकूर, सुत्रसंचलन श्री. खानोलकर तर प्रकाश पारकर यांनी आभार मानले.
चौकट
भारुड महोत्सवातून समाजप्रबोधनाची ताकद
आजुबाजुला ज्या घटना घडतायत जे हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहतात त्यांना अशा पध्दतीच्या भारुड महोत्सवाच्या माध्यमातून आपण एक हिंदू म्हणून त्या आवाजांना थेट त्यांच्या विरुद्ध उभ राहू शकतो एवढी ताकद भारुड महोत्सवात आहे. या भारुड महोत्सवामध्ये एकूण नामवंत १२ बुवांनी सहभागी होवून विविध अध्यात्मिक कथा सांगत समाज प्रबोधन करण्याचे काम केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.