

swt1019.jpg
56405
सावंतवाडी : कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे
साहित्यिक उपक्रमांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात पार पडली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सभेच्या सुरुवातीला क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षात झालेल्या जमाखर्चास मान्यता देण्यासह पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, साहित्य संमेलनांसह दरवर्षी होणारे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सचिव संतोष सावंत, नकुल पार्सेकर, उषा परब, प्रा. सुभाष गोवेकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुस्मिता चव्हाण, विजय देसाई, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, अभय नेवगी, संतोष पवार, प्रा. गणपत शिरोडकर, अरूण पणदूरकर, प्रा. एस. एन. मुक्कनवार, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर, मीरा कासार आदी उपस्थित होते. यावेळी वार्षिक सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम वाचन मंदिरचे तसेच उपस्थित सर्वांचे अभिमन्यू लोंढे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.