कायदा 2000 मध्ये सुधारणा करण्याची गरज नव्हती

कायदा 2000 मध्ये सुधारणा करण्याची गरज नव्हती
Published on

जाती प्रमाणपत्र कायद्यात बदल नको
गजेंद्र पौनीकर ः जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः ‘अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कायदा २००० मध्ये सुधारणा करण्याची गरजच नव्हती. हा अन्यायग्रस्त आदिवासींवर आघात करणारा आहे. त्यात आणखी भर घातली आहे, असे ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले.
ऑफ्रोह व महिला आघाडी रत्नागिरीच्या वतीने निवळी (रत्नागिरी) येथील एकांत हॉटेलच्या सभागृहात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ऑफ्रोह रत्नागिरीची मासिक सभा, सेवानिवृत्त सभासदाचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ऑफ्रोह चे जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, उपाध्यक्षा नंदा राणे, कार्याध्यक्ष बापूराव रोडे, सचिव हेमराज सोनकुसरे, ऑफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा पारशे, अरुण बावीस्कर यांच्यासह ऑफ्रोहचे सभासद उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे यांनी ऑफ्रोह संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. उपाध्यक्ष नंदा राणे यांनी ऑफ्रोह च्या एकजुटीमुळे अधिसंख्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com