

फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीचे
मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत २८ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर या ३१ दिवसांच्या कालावधीत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण सलग असून सकाळी ९: ३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत असणार आहे.
प्रशिक्षणमध्ये, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग बेसिक, अल्बम आणि फोटो डिझायनिंग, स्टुडिओ मॅनेजमेंट, कॅमेरा, लेन्स, मॅजिकल फोटोग्राफी, फॅशन पोजेस, वेडिंग आणि इव्हेंट्स आदी विषय प्रात्यक्षिकासह शिकविले जाणार आहेत.
याचबरोबर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व उद्योजकता विकास या विषयी मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात प्रशिक्षण, चहा नाश्ता, जेवण, निवास व्यवस्था मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापर्यंत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असावा. उमेदवार उमेद बचत गटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा रोजगार हमी योजना कार्डधारक यापैकी एका पात्रतेत पात्र असणारी व्यक्ती प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.