

- rat११p८.jpg-
26O56546
चिपळूण ः दळवटणे येथील कब्रस्तान परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्या व मान्यवर.
दळवटणे कब्रस्तानासाठी निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः तालुक्यातील दळवटणे मोहल्ला येथील कब्रस्तान परिसरातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, त्याचे भूमीपूजन पंचायत समिती सदस्या मेघा इंगावले यांच्या हस्ते करण्यात आले. हा निधी आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला होता.
या वेळी इंगावले म्हणाल्या, आमदार निकम यांच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक समाजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. विकासकामे करताना कोणताही भेदभाव न करता सर्व समाजांना समान संधी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. दळवटणे मोहल्ल्यातील कब्रस्तान आणि रस्ता विकासासाठी यापूर्वी निधी देण्यात आला असून, आता कब्रस्तान परिसरासाठी निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची गरज पूर्ण होत आहे. या वेळी चिपळूण तालुका नाभिक समाज अध्यक्ष संजय जाधव, गुलामहुसैन चिपळूणकर, अब्दुल कडवेकर, दिलदार भेलेकर, इरफान भेलेकर, शरीफ कडवेकर, अशरफ कडवेकर, सुरेखा कराडकर, अमान चिपळूणकर, अहमद तळवलकर, प्रदीप निकम, प्रीतम गमरे, अस्मिता घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.