

- rat११p६.JPG-
26O56544
लांजा ः शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या गणेशमूर्ती निर्मितीची पाहणी केली.
---
मानस शिंदे, आकाश दरडे प्रथम
गणेशमूर्ती स्पर्धा ; लांज्यात ठाकरे सेनेतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः शिवसेना (ठाकरे गट) तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लांजा येथे आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेत लहान गटात मानस शिंदे तर मोठ्या गटात आकाश दरडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
गणेशोत्सवाच्या परंपरेसोबतच पर्यावरणाची जपणूक व्हावी, या उद्देशाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेला बालमूर्तीकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी अशा दोन गटांमध्ये पार पडली. माजी खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी करत त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेचे परीक्षण शिल्पकार संदीप सावंत, किरण बेर्डे, विशाल मसणे आणि सुवारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, चंद्रकांत शिंदे, जगदीश जुलूम, युवराज हांदे, पूर्वा मुळे, अभी राजेशिर्के यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. या स्पर्धेचा तालुकास्तरीय निकाल असा, (प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ याप्रमाणे) : लहान गट (५वी ते ७वी) : मानस शिंदे (वेरवली), मंथन कोले (लांजा), सिद्धी मोसमकर (वेरवली विद्यालय), चित्रश गुरव (इसवली) व परिणिती जाधव (शिरवली). मोठा गट (८वी ते १०वी) : आकाश दरडे (वेरवली विद्यालय), गंधर्व धावडे (शिपोशी विद्यालय), पार्थ साळवी (लांजा विद्यालय), नीलेश कुंभार (पुनस विद्यालय) व ओम मोरे (पुनस विद्यालय).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.