निलम जाधव

निलम जाधव
Published on

मागासवर्ग कल्याण समिती
सभापतीपदी नीलम जाधव
चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापतीपदी निवड झालेल्या नीलम जाधव-मोहिते यांनी काल (ता. १०) पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर यांच्यासह विविध गटांचे नेते, सभापती, नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी पाणी सभापती निहार कोवळे, उबाठा गटप्रमुख विकी नरळकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, महिला व बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, फैसल कास्कर यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
------
‘सायबर शिक्षा’बाबत जनजागृती
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘सायबर वॉरियर क्लब’ आणि ‘क्विक हील फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत शहरातील एस. एस. मोबाईल येथे नुकतेच सायबर जागरूकता सत्र पार पडले. वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत सजग राहावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
या सत्रात आर्थिक अनियमितता, ओटीपी फ्रॉड, ॲप परवानग्या (अ‍ॅप परमिशन) आणि मॉर्पिंगसारख्या सायबर धोक्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन व्यवहारावेळी कोणालाही ओटीपी किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंक्सपासून दूर राहावे आणि मोबाईलमध्ये ॲप्स इन्स्टॉल करताना त्यांच्या परवानग्या काळजीपूर्वक तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच, सोशल मीडियावर फोटो किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाच्या काळजीबाबतही सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. या सत्रात सायबर वॉरियर्स सृष्टी पाटील आणि श्रवण बोथळे यांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com