माजगावात 17 ऑगस्टला अभंगवाणी संगीत कार्यक्रम

माजगावात 17 ऑगस्टला
अभंगवाणी संगीत कार्यक्रम
Published on

माजगावात अभंगवाणी संगीत कार्यक्रम
सावंतवाडी : ​पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून माजगाव येथील संगीत मित्रमंडळ आणि श्रीकृष्ण सावंत यांच्या वतीने श्री देव महादेव मंदिर येथे ''अभंगवाणी'' या विशेष भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता माजगाव येथील श्री देव महादेव मंदिर प्रांगणात पार पडणार आहे. हरी नामाचा गजर करी, भक्ती रसात रंगूनी जाऊ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भक्तीमय अभंगांची सुरेल मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. श्रावण मासातील या मंगलमयी वातावरणात संगीत मित्रमंडळ, माजगाव यांनी सर्व भाविकांना आपल्या परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com