वीजप्रश्नामुळे पिंगुळीवासीय हैराण

वीजप्रश्नामुळे पिंगुळीवासीय हैराण
Published on

56577

वीजप्रश्नामुळे पिंगुळीवासीय हैराण

महावितरणकडे गाऱ्हाणे; व्यापाऱ्यांचे हाल, दखल घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ : ​पिंगुळी येथे गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.
​पिंगुळीमध्ये वारंवार वीज जाण्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर, विद्युत उपकरणांवर तसेच विविध कामांवर परिणाम होत आहे. आगामी गणेश चतुर्थीसह धार्मिक सणांना सुरुवात होणार असल्याने व्यापारी वर्गाची लगबग सुरू आहे. अनेक बचत गटांकडून विविध वस्तू व सजावटीचे साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामाचा खोळंबा होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
​यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील म्हापसेकर आणि उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी पिंगुळीतील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता वनमोरे व उपअभियंता निळकंठ यांनी संबंधित लाईनमनशी फोनवरून संपर्क साधत पिंगुळीतील वीजपुरवठ्याचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संजय वाळके, अनिकेत आंदुर्लेकर, संदीप करगुटकर, आबा मार्गी, बाळा खोत आदी उपस्थित होते.
----
समस्या दूर करण्याची ग्वाही
​गणेश चतुर्थीच्या सणकाळात व्यापारी व नागरिकांना वीजपुरवठ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तसेच पुढील आठ दिवसांत पिंगुळी गावातील वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेला दिले.
​महावितरणच्या या आश्वासनामुळे पिंगुळीतील व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला असून, आठ दिवसांत प्रत्यक्षात समस्या कितपत दूर होते, याकडे आता पिंगुळीवासीयांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com