

शैक्षणिक धोरणाबाबत ''एसपीके''त मार्गदर्शन
सावंतवाडी ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची उच्च शिक्षणातील अंमलबजावणी यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील शाखानिहाय श्रेयांक पडताळणी या कार्यशाळेमध्ये केली जाणार आहे. यासाठी प्राचार्य डॉ. बांबर्डेकर (कॉमर्स अधिष्ठाता वाणिज्य विभाग), प्रा. डॉ. सुचित्रा नाईक (अधिष्ठाता, कला शाखा), डॉ. प्रवीण सिनकर, डेटा अनालिस्ट मुंबई विद्यापीठ हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता समन्वय कक्षाचे समन्वयक, परीक्षा विभाग प्रमुख, एनईपी समन्वयक उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनी केले आहे.
....................
swt1118.jpg
56621
मळगाव ः मुख्याध्यापक फाले यांच्याकडे मदत सुपूर्द करताना मेघना राऊळ व इतर.
समता महिला मंडळाकडून गरजूंना मदत
सावंतवाडी ः समता महिला मंडळ, सावंतवाडीच्या वतीने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेच्या दोन गरीब व होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत म्हणून २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ही रक्कम प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्ष सुवर्णा आवटे, सचिव मेघना राऊळ, खजिनदार सुस्मिता नाईक, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, प्रज्ञा मातोंडकर, आनंदी मोर्ये आदी उपस्थित होते. ही रक्कम कायमस्वरुपी ठेवीच्या व्याजातून विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत मिळावी, या उद्देशाने देण्यात आली आहे. मंडळाच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी हातभार लागणार आहे. यावेळी मेघना राऊळ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. पर्यवेक्षक विठ्ठल सावंत यांनी आभार मानले.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.