

56633
विशाल आचरेकर यांचा सत्कार
मालवण : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सातमधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक सुदेश आचरेकर आणि शंकर मंदिर मित्रमंडळ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. प्रभागातील सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विशाल आचरेकर यांनी घेतलेल्या मेहनतीचे नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी कौतुक करत शहरातून बिएलओ म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी नरेश हुले, अभय कदम, हेमंत कोचरेकर, उदय मोंडकर, राजेश वाघ, मनोज आचरेकर, हरेश ढवळे, अनिकेत जोशी, सचिन टिकम, जयेंद्र लोणे, राजू इब्रापूरकर, उमेश हुले, नितेश पेडणेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.