मालवण लायन्स क्लबतर्फे सेवांगण परिसरात वृक्षारोपण

मालवण लायन्स क्लबतर्फे
सेवांगण परिसरात वृक्षारोपण
Published on

56653

मालवण लायन्स क्लबतर्फे
सेवांगण परिसरात वृक्षारोपण

मालवण, ता. ११ : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लबच्या वतीने धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात आज वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कडूलिंबाची चार आणि आवळ्याचे एक अशा एकूण पाच रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांच्यासह सदस्य रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, रूपा कांदळकर, विजेता मेथर आणि बागवे काका उपस्थित होते. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून सेवांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संदेशही यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com