

-rat११p३०.jpg-
26O56662
रत्नागिरी ः दामले शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक.
---
दामले विद्यालयाची शिष्यवृत्तीत गरुडझेप
गुणवत्ता यादीत २० विद्यार्थी; पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : शहरातील नगरपालिकेची शाळा क्र. १५ दामले विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ४थी व ७वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये २० विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकले आहेत. पार्थ आग्रे हा विद्यार्थी २७० गुणांसह ७वी शिष्यवृती शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम आला आहे.
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी असे ः चौथी शिष्यवृत्ती- युवराज ओलेकर जिल्ह्यात २रा (२७० गुण), श्रीवल्लभ कुलकर्णी १०वा (२५२), माहिरा सय्यद २२वी (२४०), आराध्या कोकरे ४७वी (२२६), ईरा भावे ६२वी (२१८), श्वेत पांचाळ ७२ वा (२१६), स्वानंदी धुळप ७५वी, (२१४), अर्णव करडे ९१वा (२०८ ), भूमी भवतले ९६वी (२०४), प्रेम कोकरे १००वा (२०२), श्रीशा कोतवडेकर ११०वी (२०२). सातवी शिष्यवृत्ती ः पार्थ आग्रे जिल्ह्यात १ला (२७०), आर्या शिंदे ४थी (२६४), आभा लोगडे ६वी (२६२), आदित्य वाघचवरे ९वा (२५४), अक्षाली सांबरे ३०वी (२२६), अद्वैता देसाई ५१वी (२१६), स्वरा सुवरे ५२वी (२१४), आराध्या कामतेकर ७६वी (२०६), उत्कर्षा माळी ८१वी (२०४) यांनी यश मिळवले.
----
प्रांताधिकारी देसाई यांच्या दोन्ही मुलांचे यश
रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचा मुलगा अभिनव देसाई याने सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ५५वा क्रमांक पटकावला. तो पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मुलगी मनस्वी देसाई हिने चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ८वा क्रमांक पटकावला. ती कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरमध्ये शिकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.