जिल्हा बॅंकेच्या योजनांची कृषिदूतांनी घेतली माहिती

जिल्हा बॅंकेच्या योजनांची
कृषिदूतांनी घेतली माहिती
Published on

56783


जिल्हा बॅंकेच्या योजनांची
कृषिदूतांनी घेतली माहिती

ओरोस : शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध बँकिंग सुविधा आणि कृषी कर्ज योजनांचा अभ्यास करण्यासाठी कुंदे गावातील कृषिदूतांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. या भेटीत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी), विविध पीक कर्जे, त्यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती कृषिदूतांनी जाणून घेतली. कुंदे गावातील कृषीदूत राहुल राठोड, सिद्धार्थ भोसले, मानस पाटील, पृथ्वीराज मदने आणि तेजस माळी यांनी सोमवारी (ता. १०) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना बँकेच्या कार्यपद्धतीसह शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि बँकिंग सुविधांची माहिती दिली. किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पीक उत्पादनासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी या योजनेतून उपलब्ध होणारे कर्ज, त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच या सुविधेचा शेतकऱ्यांनी कसा लाभ घ्यावा, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com