

मालवण वाचनालयातर्फे २९ ला वक्तृत्व स्पर्धा
मालवण : येथील नगर वाचन मंदिरच्या वतीने विंदा रामकृष्ण जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २९ ऑगस्टला करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. गट पहिला (तालुकास्तरीय) मालवण तालुक्यातील सर्व शाळांमधील पाचवी ते सातवीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी. प्रथम सत्र २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता असून ५ ते ७ मिनिटे वेळ स्पर्धकाला दिला जाईल. ''माझ्या स्वप्नातील भारत'', ''शिस्त ही यशाची गुरुकिल्ली'', ''माझे आवडते पर्यटन ठिकाण'' यातील एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे. गट दुसरा (जिल्हास्तरीय) ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील आठवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी. द्वितीय सत्र दुपारी १.३० वाजता असून ८ ते १० मिनिटे वेळ दिला जाईल. ''पेपरफुटीमागचे राजकारण'', ''सायबर क्राइम कसे रोखणार?'', ''स्क्रीनटाईम आणि आजची तरुण पिढी'' यातील एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच जाहीर केला जाईल. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविले जाईल. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह नागेश कदम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.