

सहाय्यक मत्स्य व्यवसाय
आयुक्तपदी जीवन सावंत
पदोन्नतीने नियुक्ती; मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यास गती
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय गट-अ (तांत्रिक) या पदावर नियुक्ती झाली आहे. राज्यशासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने या संदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील गट-ब (तांत्रिक) संवर्गातील अधिकाऱ्यांना गट-अ (तांत्रिक) संवर्गात 6व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. या प्रक्रियेत राज्यातील एकूण सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यात रत्नागिरीत कार्यरत असलेले जीवन सावंत यांना पदोन्नतीनंतर रत्नागिरीतच सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर आनंद व्यक्त केला जात आहे. शासन आदेशात नमूद केल्यानुसार ही पदोन्नती सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नियमावलीच्या अधीन राहून देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सावंत यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विकासाच्या विविध योजनांना आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.