चिपळूण ः डेरवण मार्गावरील रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी

चिपळूण ः डेरवण मार्गावरील रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी
Published on

rat12p4.jpg-
56761
चिपळूण ः तालुक्यातील डेरवण मार्गावरील रस्त्याची अशी चाळण झाली आहे.

डेरवण मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण
तात्पुरती मलमपट्टी; जांभ्याची खडी, मातीचा वापर
चिपळूण, ता. १२ : तालुक्यातील महत्त्वाचा आणि गजबजलेला डेरवण मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागतिक दर्जाचे वालावलकर रुग्णालय, कोकणातील पहिले विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंग्लिश मीडियम शाळा तसेच विविध शैक्षणिक व आरोग्य संस्था या मार्गावर असल्याने येथे दिवसभर विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते; मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
विशेष म्हणजे या खड्ड्यांबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे खड्ड्यांची दुरूस्ती डांबरीकरणाऐवजी जांभ्याची (चिऱ्याची) खडी व माती टाकून केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसामुळे काही तासांतच ही खडी व माती वाहून जात असून, खड्डे पुन्हा पूर्ववत होत आहेत. त्यामुळे दुरूस्तीचा हा प्रकार केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. येथील प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रुग्णवाहिकांच्या वाहतुकीलाही याचा फटका बसत असून, रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही रोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या असून, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची आणि सदर मार्गावरील धोक्याच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com