बावळाटमध्ये रस्त्याची चाळण

बावळाटमध्ये रस्त्याची चाळण
Published on

56832

बावळाटमध्ये रस्त्याची चाळण

स्थानिक आक्रमक; अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठी डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ : दाणोली-बांदा या मार्गावर सातुळी-बावळाट येथे रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. आंबोलीमार्गे गोव्याकडे जाणाऱ्यांसाठी हा जवळचा मार्ग आहे. याची तत्काळ दुरुस्त करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करावे लागेल, असा इशारा आज बावळट येथील ग्रामस्थांनी दिला. कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना तसे निवेदनही दिले.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले हे की, बावळाट गावातून जाणाऱ्या दाणोली-बांदा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात रस्त्याला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून रस्त्यावर खोदकाम केल्याने वाहनधारकांना प्रवासादरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
------
...तर उपोषणाचा मार्ग स्वीकारू!
याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य न केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर एकनाथ परब, महादेव बिरोडकर, भालचंद्र नाईक यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com