परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात दीपपूजन कार्यक्रम

परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात दीपपूजन कार्यक्रम
Published on

rat१२p१७.jpg-
26O56829
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात बोलताना संस्थाध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर. सोबत मुख्याध्यापक विनोद नारकर आणि पालक प्रतिनिधी.
---
‘अभ्यंकर’ विद्यामंदिरात दीपपूजन
रत्नागिरी, ता. १२ : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात आज दीप अमावस्येनिमित्त पणत्या, समई, निरांजन, कंदील, अनेक जुने प्रकारचे दीप उजळून दीपपूजन करण्यात आले. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
विद्यामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य शुभांगी वायकूळ, मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम व अन्य सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन केले. संस्थाध्यक्ष ॲड. परुळेकर म्हणाले, कौन्सिल सदस्य विशाखा भिडे यांच्या सूचनेवरून दीपपूजन हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे अनुकरण विविध शाळांमध्येही केले जात आहे. असेच अनेक कार्यक्रम आपल्या शाळांतून सुरू व्हावेत. या प्रसंगी वायकूळ यांनी दीप अमावस्येचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना आपण चांगले वागले पाहिजे, चांगले संस्कार घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com