

‘अटल’तर्फे ३० ऑगस्टला
सावंतवाडीत विविध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने अटल प्रतिष्ठानच्या वतीने गेली वीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने संस्कृत भाषेतील विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यंदाही संस्कृत दिनाचे औचित्य साधून ३० ऑगस्टला सकाळी १० वाजता येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. अमुल पावसकर तसेच कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष व उद्योजक डॉ. नितीन पावसकर यांनी आपले वडील महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. एकूण तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. यात पाचवी ते सहावी या पहिल्या गटासाठी गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा, सातवी ते आठवी या दुसऱ्या गटासाठी संस्कृत गीत गायन स्पर्धा, तर इयत्ता नववी ते दहावी या तिसऱ्या गटासाठी संस्कृत कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या स्पर्धकांना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतीचिन्हे प्रदान केली जाणार असून, सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांना स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यालयीन सहाय्यिका ज्योती राऊळ यांच्याशी संपर्क साधून २५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर व कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.