

- rat१२p१.jpg-
26O56756
संगमेश्वर ः जाखडीचा सराव करणारे युवक.
----
गावागावांत जाखडीची रंगीत तालीम
गणेशोत्सवाची तयारी; सादरीकरणात आधुनिकतेची जोड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः गणेशोत्सव आणि जाखडी नृत्य यांचे कोकणातील संबंध अतूट आहेत. शेतीकामातून उसंत मिळाली की, कोकणातील कलाकार जाखडीच्या सरावात मग्न होतात. आता गणेशोत्सवाला महिनाभर शिल्लक राहिल्यामुळे गावागावात गणा धाव रे मना पाव रे ... चे सुर ऐकू येऊ लागले आहेत. ढोलकीच्या तालावर थिरकणारी तरूणाई जाखडीचा सराव करत आहे.
जाखडी नृत्यासाठी गणेशोत्सवा आधीपासूनच गावागावातील मंडळांची लगबग सुरू असते. कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागताच प्रथम आठवण होते ती जाखडी नृत्याची. सध्या लावणी हंगाम आटोपत आला असल्याने शेतकरीवर्गाला मोकळा वेळ मिळत आहे. पावसातून अन्य कोणतेही काम करण्याजोगे नसल्याने बहुतांशी वेळ जाखडी नृत्यासाठी दिला जातो. सध्याच्या काळात प्रकाशयोजना आणि वेशभूषा यामध्ये खूपच आधुनिकता आली व यामध्ये दरवर्षी बदल होत असल्याने जाखडी कला मंडळेही सतर्क झाली आहेत.
---
मनोरंजनावर भर
सध्या जाखडीसाठी १५ ते २० वर्षांच्या मुलांची निवड केली जाते. पूर्वी हेच नृत्य करण्यासाठी ३० ते ३५ वयोगटातील तरुण सहभागी होत असत. त्या काळी यामधून समाजप्रबोधन करण्यावर भर दिला जात असे. सध्याच्या नृत्याचा भर मात्र केवळ मनोरंजनावर असल्याने समाजप्रबोधनाचा मूळ हेतूच बाजूला पडताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.