श्री गांधारेश्वर मंदिराला ''क'' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्या

श्री गांधारेश्वर मंदिराला ''क'' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्या
Published on

-rat१२p२५.jpg-
P26O56860
चिपळूण : वाशिष्ठीच्या तीरावर वसलेले श्रद्धेचे जागृत स्थान श्री गांधारेश्वर मंदिर.
-------
गांधारेश्वर मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा द्या
चिपळूणकरांची मागणी; मंदिरात अध्यात्मासोबत निसर्गसौंदर्याची अनुभूती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : शांतपणे वाहणारी वाशिष्टी नदी, सभोवताली दाट हिरवाई, मंदिराच्या गाभाऱ्यातील भक्तिमय वातावरण आणि नदीकाठची प्रसन्न शांतता अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेले श्री गांधारेश्वर मंदिर हे चिपळूणच्या धार्मिक आणि पर्यटन वैभवातील महत्त्वाचे स्थान आहे. या क्षेत्राला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिल्यास चिपळूणच्या पर्यटन वैभवात भर पडेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भगवान शंकराचे प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराकडे भाविकांसोबतच निसर्गप्रेमी आणि पर्यटकही आकर्षित होत आहेत. वाशिष्टी नदीच्या तीरावर मंदिराचे असलेले स्थान हे या परिसराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. मंदिरासमोरून वाहणाऱ्या नदीचा शांत प्रवाह आणि सभोवतालची हिरवाई यामुळे येथे आल्यानंतर काही काळ दैनंदिन धावपळीपासून दूर जाता येते. गांधारेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही योग्य ठिकाण ठरत आहे. मंदिर परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण हेही येथील आकर्षण आहे. विविध फुलझाडे आणि शोभेच्या वनस्पतींनी सजलेले गार्डन, आकर्षक नर्सरी आणि मोकळे वातावरण यामुळे परिसराला प्रसन्न रूप प्राप्त झाले आहे. गार्डनमध्ये मुक्तपणे फिरणारी बदके विशेषतः लहान मुलांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
---
प्राचीन विहिरीचे आकर्षण
मंदिर परिसरातील प्राचीन विहीरही विशेष आकर्षण आहे. या विहिरीतील पवित्र पाण्याचा उपयोग भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी केला जातो. प्राचीन परंपरेशी जोडलेली ही धार्मिक प्रथा आजही भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. मुख्य श्री गांधारेश्वर मंदिरासोबतच परिसरात इतर छोटी-छोटी देवळेही आहेत. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी विविध देवतांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळतो.

कोट
गांधारेश्वर मंदिर येथे महात्मा गांधी यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले आहे. येथे गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होतात. या देवस्थानाची माहिती सर्वदूर पसरल्यास आणि पर्यटनदृष्ट्या या देवस्थानाचा विकास केल्यास चिपळूणच्या वैभवात आणखीन भर पडेल.

- ॲड. जीवन रेळेकर, चिपळूण
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com