

-ratchl१२१.jpg -
26O56911
चिपळूण ः जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांचे स्वागत करताना सावर्डे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी.
---
औषधांचा तुटवडा होऊ देऊ नका
पूजा निकम ः आरोग्यकेंद्रातील अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः नागरिकांना उपचारासाठी आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असून, औषधांच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम यांनी सावर्डे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्यकेंद्रातील आरोग्य सुविधा, औषधसाठा आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांचा सविस्तर आढावा निकम यांनी घेतला. या वेळी निकम यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्रातील औषध भांडारगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. उपलब्ध औषधसाठा, आवश्यक औषधांची उपलब्धता तसेच रुग्णांना वेळेत औषधे मिळत आहेत का, याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. प्राथमिक आरोग्यकेंद्रात तपासणीसाठी आलेल्या पाण्याच्या नमुन्यांची जैविक व रासायनिक चाचणी तातडीने पूर्ण करा. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना त्याची माहिती द्यावी तसेच पाणी पिण्यास व नागरिकांच्या वापरास योग्य आहे किंवा नाही, याबाबत ग्रामस्थांना तातडीने अवगत करावे, असेही त्यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.