कुडप-धनगरवाडी रस्त्याची दुर्दशा

कुडप-धनगरवाडी रस्त्याची दुर्दशा
Published on

-rat१२p२६.jpg-
26O56867
चिपळूण ः कुडप धनगरवाडी रस्त्याची झालेली बिकट अवस्था.
---
कुडप धनगरवाडीला रस्त्याची प्रतीक्षा
दळणवळण अवघड : दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः तालुक्यातील कुडप धनगरवाडी येथील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, ग्रामस्थांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावरील माती वाहून गेल्याने मोठे दगड उघडे पडले असून, संपूर्ण रस्ता खडबडीत झाला आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच पादचारींना या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.
सुमारे दीडशे लोकसंख्या असलेल्या या कुडप धनगरवाडीतून विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांची दररोज ये-जा होत असते; मात्र रस्त्याची दुरवस्था असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की, गावात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका थेट वाडीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे नातेवाईकांना आजारी व्यक्तीला डोलीतून उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यानंतरच रुग्णाला रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात हलविणे शक्य होते. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्यावरील माती वाहून गेली असून, दगड वरती आले आहेत. दोन वर्षे आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेत पावसाळ्यात रस्त्याची डागडुजी करून दिली होती. काही वेळा ग्रामस्थ वर्गणी काढून रस्त्याची डागडुजी करतात; मात्र आता रस्ता खूपच खराब झाला आहे. प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
कुडप धनगरवाडी येथील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com