

गव्याचा फोटो वापरा
पाईपलाईनच्या पट्ट्यातून गवे संगमेश्वरात
क्रांती व्यापारी संघटना ः तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यासाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १३ : गेले काही महिने संगमेश्वरसह जिल्ह्यात गव्यांचा आढळ वाढत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोकणात उतरणाऱ्या गव्यांना या परिसरातून आलेली एका खासगी कंपनीच्या पाईपलाईनचा पट्टा सुलभ मार्ग झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही पाईपलाईन टाकण्यापूर्वी आणि त्यानंतर गव्यांचा वाढलेला वावर याचा शासनाने सखोल अभ्यास करावा, मागणी क्रांती व्यापारी संघटनेने केली आहे.
आंबा घाट परिसरातील घनदाट जंगलात गव्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र, या परिसरात गॅस पाईपलाईनसाठी तयार करण्यात आलेला काँक्रिटचा पट्टा गव्यांसाठी कोकणात उतरण्याचा सुलभ मार्ग ठरत आहे का, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. साखरपा, देवरूख आणि संगमेश्वर परिसरात सध्या गव्यांचा उपद्रव वाढला आहे. ही पाईपलाईन टाकण्यापूर्वी या भागात गव्यांचा वावर कसा होता, हे तपासण्यासाठी वनविभागाच्या जुन्या नोंदी, शेती नुकसानीचे पंचनामे, ग्रामस्थांच्या तक्रारी आणि जीआयएस मॅपिंगच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे. गवे त्या पाईपलाईनच्या मार्गावरून किती अंतर चालतात, हे शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावावेत, तसेच आवश्यकता भासल्यास गव्यांना रेडिओ कॉलर (पट्टा) लावून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
स्वतंत्र गवा अभयारण्य उभारा
गवा-मानव संघर्ष कायमस्वरूपी रोखण्यासाठी देवरूख परिसरात स्वतंत्र संवर्धन क्षेत्र (अभयारण्य) निर्माण करण्याची व्यवहार्यता शासनाने तपासावी, असा पर्यायही संघटनेने सुचवला आहे. वनविभाग, महसूल विभाग, स्थानिक प्रशासन, वन्यजीव तज्ज्ञ आणि संबंधित कंपनी यांची संयुक्त समिती स्थापन करावी आणि गवे ज्या मार्गाने वस्त्यांमध्ये उतरतात तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलावित. तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
------
कोट १
गव्यांच्या मार्गावर बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची शेती सुरक्षित करा. गव्यांना जंगल, शेतकऱ्यांना सुरक्षित शेती आणि शासनाला जबाबदारी हे तिन्ही एकाच वेळी सुनिश्चित झाले पाहिजे.
-निखिल कोळवणकर, अध्यक्ष , क्रांती व्यापारी संघटना
---
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.