

swt1225.jpg
57060
सिंधुदुर्गनगरी ः उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याशी चर्चा करताना रिक्षा महासंघाचे पदाधिकारी.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी
महासंघाचे उपोषण स्थगित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळाल्यामुळे हे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
या चर्चेदरम्यान सीएनजी रिक्षांच्या टाकी पासिंगचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. ज्याप्रमाणे कंपनीतून बाहेर पडताना सीएनजी किट बसवून दिले जाते, त्याचप्रमाणे टाकी पासिंगची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपन्यांनीच घेतली पाहिजे, अशी मागणी महासंघाने केली. यावर श्री. काळे यांनी संबंधित कंपन्यांच्या डिलर्सना बोलवून किंवा लेखी आदेश देऊन टाकी पासिंगची सोय उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
या बैठकीला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर कुडाळ तालुकाध्यक्ष रवींद्र माने, मंगेश सावंत (कणकवली), संदीप सावंत (मालवण), उपाध्यक्ष सुनील पाताडे, एकनाथ राऊळ (वेंगुर्ले), बांदा-दोडामार्ग तालुकाध्यक्ष राजेश बांदेकर, दोडामार्ग अध्यक्ष संतोष कळमकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.