

kan१३१.jpg
५७००५
कणकवली ः येथील नगराध्यक्ष दालनात संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
बोगस मतदार नोंदणीविरोधात उद्या उपोषण
संदेश पारकर : प्रशासनाला चार पत्रे देऊनही लेखी उत्तर नाही
कणकवली, ता. १३ : चोवीस वर्षानंतर नव्याने मतदार यादी तयार होत आहे. मात्र या यादीमध्येही पूर्वीचाच चुका केल्या जात आहेत. त्याबाबत चार पत्रे पाठवून देखील प्रशासनाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे बोगस मतदार नोंदणीविरोधात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपोषण करणारच, अशी भूमिका कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पारकर बोलत होते. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणा, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे आतापर्यंत सुमारे चार पत्रव्यवहार केले आहेत. शेवटच्या पत्राद्वारे १३ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने चर्चेसाठी पुढे यावे अथवा मागण्यांबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी स्पष्ट मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणत्याही पत्राला लेखी उत्तर मिळालेले नाही.
ते म्हणाले, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, शिक्षक तसेच अन्य शासकीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. या प्रक्रियेसाठी जनतेचा पैसा खर्च होत असल्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार होणे आवश्यक आहे. आम्हाला कणकवली शहरात अनेक मतदारांच्या नोंदणीबाबत संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्याबाबतचे पुरावे आम्ही प्रशासनाकडे सादर केले. दुबार मतदार नोंदणी होऊ नये, कुटुंबाच्या नोंदणीच्या नावाखाली चुकीची माहिती नोंदवली जाऊ नये आणि ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी तिची योग्य मतदार म्हणून नोंदणी व्हावी अशीही मागणी आम्ही केली होती. पण प्रशासनाने त्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.