सावंतवाडीत सप्टेंबरला ''इस्कॉन''तर्फे जन्माष्टमी

सावंतवाडीत सप्टेंबरला ''इस्कॉन''तर्फे जन्माष्टमी
Published on

सावंतवाडीत सप्टेंबरला
‘इस्कॉन’तर्फे जन्माष्टमी
​सावंतवाडी : येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) वतीने ५ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव आयोजित केला आहे. हा सोहळा सायंकाळी ५.३० वाजता येथील पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडणार आहे. ​या महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक, प्रवचन, नाटिका आणि कृष्णप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी इस्कॉन पंढरपूरचे वक्ते सहस्रनाम प्रभुजी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ​ज्या भाविकांना दूध, दही, अन्नधान्य, फुले व फळे आदी वस्तूंचे दान करायचे असेल, त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा. .................
राजर्षी शाहू महाराज
शिष्यवृत्ती योजना
सिंधुदुर्गनगरी ः देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत ''राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना'' राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ४ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती, जाहिरात, अर्जाचा नमुना व नियमावली महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून विहित अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज परिपूर्ण भरावा व आवश्यक कागदपत्रांसह ४ सप्टेंबरपर्यंत आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे सादर करावा.
...................
सिंधुदुर्गनगरीत सोमवारी
महिला लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी ः ऑगस्ट महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता. १७) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करून घ्यावेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज किंवा सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
..................
तीन स्थानिक
सुट्या जाहीर
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी २०२६ करिता तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १७ ऑगस्ट (नागपंचमी), १८ सप्टेंबर (ज्येष्ठागौरी पूजन) आणि ९ नोव्हेंबर (धनत्रयोदशी) या दिवशी स्थानिक सुटी राहणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जारी केली आहे.
...........
ग्रंथालय पुरस्कारासाठी
अर्ज देण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : २०२५-२६ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच पात्र ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव तीन प्रतींमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com