

सावंतवाडीत शनिवारी
देशभक्ती गीत स्पर्धा
सावंतवाडी, ता. १३ ः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शनिवारी (ता. १५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर प्रबोधनात्मक विषयांची आवड निर्माण व्हावी व त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. समूहगीत स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. याशिवाय शहरातील सर्व शाळांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, महिला बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.
................
शेर्ले येथे शनिवारी
गुरुपौर्णिमा उत्सव
बांदा, ता. १३ ः श्री देव ईस्वटी संगीत विद्यालय, पाडलोस यांच्या वतीने गुरुवर्य अमेय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ''गुरुपौर्णिमा उत्सव २०२६''चे आयोजन शनिवारी (ता. १५) शेर्ले कापईवाडी येथे सुरेश सातोसकर यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रमाणपत्र वितरण होईल. सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांचे तबला व पखवाज सोलो, ६ वाजता गुरुपूजन सोहळा व अल्पोपहार, ६.३० वाजता विद्यार्थ्यांचे गायन, तर रात्री ८ वाजता मान्यवर कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. या उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.