-नाखरे-कालकरकोंड शाळेत दीपपूजा

-नाखरे-कालकरकोंड शाळेत दीपपूजा
Published on

-rat१३p२४.jpg-
26O57105
पावस ः नाखरे-कालकरकोंडवाडी शाळेत दीपपूजन करताना विद्यार्थी.
------
नाखरे-कालकरकोंड शाळेत दीपपूजा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालकरकोंड येथे आषाढ अमावस्येनिमित्त दीपपूजा हा विशेष कार्यक्रम झाला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी तसेच महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आषाढ अमावस्येला ‘दीप अमावस्या’ किंवा ‘दिव्यांची अमावस्या’ असे म्हटले जाते. तमाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा हा सण म्हणजे दीप अमावस्या, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. चातुर्मासात शरीर आणि मनाला शिस्त लावण्यासाठी एखादा संकल्प करण्याची परंपरा आहे. चांगल्या सवयी अंगीकारणे, संयम पाळणे आणि मनाला सकारात्मक विचारांची दिशा देणे, हा या परंपरेमागील विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन वैदेही जोशी, उमेश लिंगयत आणि अनंत कदम या शिक्षकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com