

rat14p3.jpg-
57212
शृंगारतळीः येथील रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे.
शृंगारतळीत मोकाट जनावरांचा डेरा
बंद पथदीपांमुळे अपघाताचा धोका वाढला; वाहनचालक व नागरिक हैराण
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १४ ः गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत मोकाट जनावरांचा ठिय्या आणि बंद पथदीपामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी भररस्त्यात बसणाऱ्या जनावरांमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गुहागर तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या शृंगारतळी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने गायी व बैल रस्त्यावर ठाण मांडतात. विशेषतः आबलोली फाटा, शृंगारतळी चेकपोस्ट, पालपेणे फाटा आणि वेळंबफाटा या भागांत जनावरांचा वावर अधिक असतो. वाहनांचा हॉर्न वाजवूनही ही जनावरे बाजूला हटत नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे स्थानिक प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, अपघात घडल्यानंतर केवळ पंचनामा करण्यापुरतीच प्रशासनाची भूमिका मर्यादित राहिली आहे.
शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने उभारलेले पथदीप गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. पथदीप सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पसरणाऱ्या काळोखामुळे जनावरांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
चौकट
कठोर कारवाईची गरज
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या समस्येवर ग्रामपंचायत पातळीवरील प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे आता तालुका प्रशासनाने व महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि बंद पथदीप त्वरित सुरू करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.