

संजू परब यांच्या वाढदिनी
विविध उपक्रम ः राऊत
सावंतवाडी, ता. १४ : सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १९ आणि २० ऑगस्ट रोजी सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दशावतार नाट्य प्रयोग, गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांसाठी वृक्ष संवर्धन मोहीम यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊत व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजू परब यांच्या कार्यालयात नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीला सचिव प्रताप परब, ॲड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुनील खानोलकर, तारकेश सावंत, अशोक सांगेलकर, विजय चव्हाण, प्रमोद सावंत, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, गजानन बांदेकर, विभावरी सुकी आणि संदीप सुकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कसई-दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा पारंपरिक दशावतार नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. दशावतार कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ८:३० वाजता सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान गौरव सोहळा पार पडेल. या सोहळ्यात माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धन व जतनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘एक झाड लावण्याची’ अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २० ऑगस्ट रोजी सह्याद्री पट्ट्यातील शाळांमध्ये सुपारीच्या रोपांचे वाटप केले जाईल. सकाळी १०:३० वाजता कलंबिस्त हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना १०० सुपारीची रोपे दिली जातील, तर दुपारी १२ वाजता कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात १०० सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.