बॅंक ऑफ इंडियातर्फे तिरंगा बाईक रॅली

बॅंक ऑफ इंडियातर्फे तिरंगा बाईक रॅली
Published on

rat14p16.jpg-
57321
रत्नागिरी : बॅंक ऑफ इंडियातर्फे येथे तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
----------
बॅंक ऑफ इंडियातर्फे तिरंगा बाईक रॅली
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा बॅंक म्हणजेच बॅंक ऑफ इंडियातर्फे तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयापासून उत्साहात सुरू झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जयस्तंभ, रत्नागिरी येथे रॅलीचा यशस्वी समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रप्रेम, एकता आणि देशाप्रती समर्पणाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत ठेवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता, असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com