

57483
बांदा : पीएमश्री केंद्रशाळेत आयोजित समूहगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर.
बांदा केंद्र शाळेत स्वातंत्र्य महोत्सव
बांदा, ता. १६ : पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय ‘स्वातंत्र्य महोत्सवा’ला अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या देशभक्तीपर समूहगीत गायनाने उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. १३, १४ आणि १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, पहिल्या दिवशी देशभक्तीचा उत्सव चिमुकल्यांच्या सुरेल सादरीकरणाने खुलला.
१३ ऑगस्ट रोजी प्रथम ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अंगणवाडीतील बालके, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहभागाने तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, पत्रकार निलेश मोरजकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, केंद्रप्रमुख अमोल पाटील, राकेश परब, संपदा देसाई, संतोष बांदेकर, ग्रामसंघ अध्यक्ष शिल्पा सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार निलेश मोरजकर यांचा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समूहगीत स्पर्धेत बांदा पानवळ अंगणवाडीने प्रथम क्रमांक, बांदा निमजगा अंगणवाडीने द्वितीय क्रमांक, तर बांदा उभा बाजार अंगणवाडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना पारितोषिके व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली, तर सहभागी सर्व संघांना उत्तेजनार्थ सन्मानपत्र देण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी ध्वजवंदनासह चित्रकला स्पर्धा व ‘क्रांतिकारक’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस तनुजा देसाई, रत्नप्रभा सावंतमोर्ये, देवयानी डेगवेकर, वर्षा आगलावे, किरण गावडे, मानसी बांदेकर, योगिता शिरोडकर, अक्षता सावंत यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच मुख्याध्यापक शांताराम असनकर, शिक्षक उदय सावळ, अर्चना देसाई, कृपा कांबळे, जागृती धुरी, रंगनाथ परब, कृणाली मस्के, मनीषा मोरे, फ्रान्सिस फर्नांडिस, सुप्रिया धामापूरकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उदय सावळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी प्रास्ताविक केले. समूहगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून रंगनाथ परब व मनीषा मोरे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.